AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसआयआरबाबत बिहारमध्ये जे झालं तेच महाराष्ट्रात होण्याची भीती, रोहित पवारांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर बोलताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

एसआयआरबाबत बिहारमध्ये जे झालं तेच महाराष्ट्रात होण्याची भीती, रोहित पवारांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?
rohit pawar Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 17, 2026 | 11:23 AM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर बोलताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनी पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती दिली आहे की, जवळपास एक कोटी 76 लाख मतदार जे आहेत, ते एसआयआरच्या प्रक्रियेमधून वगळणार आहेत. परंतु त्यांना पुन्हा एकदा फॉम नंबर 6 भरून मतदार होण्याची संधी निवडणूक आयोग देणार आहे, असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला होता, यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

एसआयआरबाबत बिहारमध्ये जे झालं तेच महाराष्ट्रात होण्याची भीती आहे. एक तुम्ही समजून घ्या, फॉम सहा हा जो फॉम आहे, तो रेग्यूलर फॉम असतोच. 2024 साली जे लोकसभेचं इलेक्शन झालं, तेव्हा महाराष्ट्रात लाखो मतदार वाढले होते, फॉम 6 च्या माध्यमातून अचानक वाढले अन् अचानक डिलिट सुद्धा झाले. त्यावर आम्ही सादरीकरण देखील केलं होतं, तो मुद्दा आम्ही मांडला होता. एकाच खोलीमध्ये हजार लोक राहतात असं तिथे दाखवण्यात आलं होतं. मतदान झाल्यानंतर त्यातील एकही मतदार सापडला नाही, फॉम 6 चा वापर करून, निवडणुकीच्या आधी अनाधिकृतपणे मतदार वाढवले जातात. त्यामुळेच आमचा फॉम 6 वर अक्षेप आहेत, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  ते फॉम 6 चा वापर करून निवडणूक आयोग मतदारांच्या नोंदी कशा करणार हे आम्ही समजून घेणार आहोत. आमचं म्हणणं आहे की, विधानसभा, लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी असताना एवढा खटाटोप कशासाठी? एवढ्याच दिवसात झालं पाहिजे, तेवढ्याच दिवसांमध्ये झालं पाहिजे. टार्गेट दिल्यामुळे हे बिएलओ त्यामध्ये नको ती कामे करत आहेत. हे कुठेतरी लोकशाहीला धोकेदायक होऊ शकतं. संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे, तो देखील जाऊ शकतो. हे आमचं सर्वांचं मत आहे, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत