AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

| Updated on: Oct 01, 2026 | 4:56 PM
Share

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात 40-50 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन पीक पूर्णतः करपले आहे. शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे, कारण त्यांचा बियाणे, खत व मजुरीचा खर्चच सुमारे 25,000 रुपये प्रति एकर झाला आहे. शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न आणि रब्बी हंगामासाठी तातडीने मदत देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात गेल्या 40 ते 50 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे जळून गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचे चित्र आहे. दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रति हेक्टरी 20 ते 25 हजार रुपये खर्च केवळ बियाणे, खत आणि तणनाशकासाठी येतो, त्यात त्यांची मेहनत पकडली जात नाही.

त्यामुळे शासनाने सरसकट प्रति हेक्टरी किमान 50,000 रुपयांची मदत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. ही मदत शेतकऱ्यांना पुढील रब्बी हंगामाची तयारी करण्यासाठी तसेच बँकांचे कर्ज आणि अन्य आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले. या संकटात शेतमजुरांनाही काम मिळत नसल्याने शासनाने त्यांच्यासाठीही विचार करावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.

Published on: Oct 01, 2026 04:56 PM

Follow Us