AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती

Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती

| Updated on: Oct 01, 2026 | 3:20 PM
Share

सोलापूर जिल्ह्याच्या उजनी धरणावर १.६५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून चार महत्त्वाचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, एआय डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्युलर रिएक्टर यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला असून, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणावर राज्य शासनाकडून चार महत्त्वाचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यासाठी जवळपास १ लाख ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पांमध्ये तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, एआय (AI) डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आणि स्मॉल मॉड्युलर रिएक्टर यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकार, जेडब्ल्यू ग्लोबल कंपनी आणि द स्पीड कारसोटियम पार्टनर्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात उजनीच्या पाण्यावर जवळपास ३००० हेक्टरवर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आणि एआय डेटा सेंटर उभारले जाईल. या प्रकल्पांसाठी उजनी धरणाजवळील पुनर्वसनासाठी संपादित केलेली ४०० एकर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पामुळे दीड ते दोन हजार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता कंपनी प्रशासनाने वर्तवली आहे. प्रकल्पाला प्रारंभिक मंजुरी मिळाल्याने आता या कामांना गती येणार आहे.

Published on: Oct 01, 2026 03:20 PM

Follow Us