AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला

रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला

| Updated on: Aug 17, 2026 | 11:46 AM
Share

रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला गेलेल्या आहेत. राज ठाकरेंकडून शिवतीर्थ निवासस्थानी या मुलींची भेट घेण्यात आलेली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ मुलींनी सोशल मीडियावरती शेअर केलेला होता आणि त्यानंतर रस्त्याचं काम झालेलं आहे आणि या मुलींची आता राज ठाकरे भेट घेत आहेत. कोंदिवडे या गावातल्या या विद्यार्थिनी आहेत ज्यांनी हा व्हिडिओ बनवला तो […]

रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला गेलेल्या आहेत. राज ठाकरेंकडून शिवतीर्थ निवासस्थानी या मुलींची भेट घेण्यात आलेली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ मुलींनी सोशल मीडियावरती शेअर केलेला होता आणि त्यानंतर रस्त्याचं काम झालेलं आहे आणि या मुलींची आता राज ठाकरे भेट घेत आहेत. कोंदिवडे या गावातल्या या विद्यार्थिनी आहेत ज्यांनी हा व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला. या मुलींनी आवाज उठवला आणि त्यानंतर अखेर या रस्त्याचं काम करण्यात आलं. या मुलींनी हा व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये या रस्त्याची दुरावस्था त्यांनी मांडलेली होती. आमच्या शाळेचे कपडे खराब होतात, लहान मुलांना वृद्धांना त्रास होतो. हे सर्व काही त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि अखेर आता राज ठाकरे या मुलींची भेट घेत आहेत. रस्त्याचं काम झालंय आणि त्यानंतर आता राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी या सर्व मुली आता शिवतीर्थावरती पोहोचल्या असल्याचं आपण पाहू शकतोय. त्यादरम्यानचे आपण हे दृश्य देखील बघतोय. कोंदिवडे गावातल्या या विद्यार्थिनी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्यात. अधिकचं अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून ते आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. निवृत्ती आता या विद्यार्थिनींनी आवाज तर उठवला, रस्त्याचं काम झालं. त्यानंतर आता राज ठाकरे या विद्यार्थिनींची भेट घेत आहेत. काय अपडेट?

नक्कीच आपण पाहायला गेलं तर नऊ दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या रविवारी जो आहे तो हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. स्वतः विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी ज्या आहेत तीन दोन विद्यार्थिनी होत्या. त्यांनी स्वतःहून बाटलीचा माईक बनवत त्या ठिकाणी रस्त्याची परिस्थिती जी आहे, ती रस्त्याची परिस्थिती त्या ठिकाणची दाखवली होती आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून जे आहे ते मोठ्या प्रमाणात व्हिडिओ जे आहेत त्या व्हायरल व्हायला सुरुवात झाली होती. आणि याच विद्यार्थिनी ज्या आहेत त्या आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती पोहोचलेल्या आहेत. राज ठाकरे नक्की त्यांच्याशी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण की याच विद्यार्थिनींमुळे संपूर्ण राज्यभरातून अनेक विद्यार्थी जे आहेत ते आपापल्या गावांमधील रस्त्याची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती दाखवायला खरंतर सुरुवात केली आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस या विद्यार्थिनींनी हा व्हिडिओ व्हायरल केला होता त्याचवेळी राज ठाकरे यांनी देखील रायगड मधून जो रोड जातो, म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग आहे, या महामार्गाची देखील राज ठाकरे यांनी स्वतः पाहणी केली होती आणि अनेक राजकीय नेत्यांवरती त्यावेळेस त्यांनी खरंतर आरोप केले होते. आणि त्याच दिवशी हा खरंतर व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्याचा आपल्याला चित्र पाहायला मिळालं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून या विद्यार्थिनींचं खरंतर संपूर्ण सर्व स्तरातून विशेष करून अनेक राजकीय विरोधकांकडून जे आहे ते या विद्यार्थिनींचं कौतुक केलं जात होतं. अनेकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोनवर फोनद्वारे देखील त्यांच्याशी संवाद साधला होता. मात्र आज या सर्व दोन्ही विद्यार्थिनी ज्या आहेत त्या आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती दाखल झालेल्या आहेत. ही जरी सदिच्छा भेट असली तरी देखील येत्या काळामध्ये राज ठाकरे हे रस्त्यांची पाहणी ज्या पद्धतीने केली होती, त्यानंतर आज देखील काय वक्तव्य करतात, विद्यार्थिनींच्या सोबत बोलत असताना काय नक्की भाष्य करतात, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल कारण की वारंवार गेल्या 16 ते 17 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत असताना अगदीच निवृत्ती धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी.

Published on: Aug 17, 2026 11:46 AM

Follow Us