AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता रणवीर सिंगला धमकी, हॅरी बॉक्सरची धमकी देतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल, पाहा VIDEO

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनंतर बिश्नोई गँगच्या हॅरी बॉक्सरची ऑडिओ क्लिप व्हायरल.

अभिनेता रणवीर सिंगला धमकी, हॅरी बॉक्सरची धमकी देतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल, पाहा VIDEO
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 14, 2026 | 3:53 PM
Share

Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सअॅपवर वॉइस नोटद्वारे काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. ज्यामध्ये त्याला कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत रणवीर सिंहच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, रणवीर सिंगला ही धमकी मिळाली असून ती एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर वॉइस नोट द्वारे दिली होती. या धमकीनंतर रणवीर सिंगने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. अशातच आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

कुख्यात लॉरेन्स गँगशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या हॅरी बॉक्सर याचा एक कथित ऑडिओ सध्या समोर आला असून त्यामध्ये अभिनेता रणवीर सिंग, दिग्दर्शक रोहित शेट्टी तसेच संपूर्ण बॉलिवूडला उघड धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या ऑडिओमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. ज्यामध्ये रणवीर, तुझे सलाह देने का बहुत शौक है ना…, असा उल्लेख.

ऑडिओमध्ये काय म्हटले आहे?

समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये हॅरी बॉक्सर नावाचा व्यक्ती संबंधित कलाकारांनी सुधारले नाही तर त्यांच्या कुटुंबीयांना आणि स्टाफला इजा पोहोचवली जाईल, अशी धमकी देताना ऐकू येत असल्याचे सांगितले जाते. संबंधित व्यक्तीकडे सर्वांची माहिती असून कधीही हल्ला करू शकतो असा इशाराही त्यात देण्यात आला आहे.

मात्र या धमकीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणत्या मुद्द्यावरून ही धमकी देण्यात आली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी रोहित शेट्टीशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, रोहित शेट्टीने यापूर्वी कधीही अशी धमकी मिळालेली नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

पोलिसांकडून ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली जात असून ती खरी आहे की बनावट, याचा शोध घेतला जात आहे. तसेच या मागे कोणाचा हात आहे याबाबतही चौकशी सुरू आहे.

बॉलिवूडमध्ये चिंता

गेल्या काही वर्षांत मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना धमक्या मिळण्याच्या घटना अधूनमधून समोर येत आहेत. त्यामुळे या नव्या प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कलाकार आणि निर्मात्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून आवश्यक ती पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिस अधिकृत निवेदनानंतरच पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.

Follow Us
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर