AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भंगार धंद्याच्या नावाखाली रेल्वे रुळांच्या बाजूला सुरु होते ड्रग्जचे रॅकेट,अखेर पोलिसांनी अशी केली कारवाई

भंगाराचा धंद्याचा आडोसा घेऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे.

भंगार धंद्याच्या नावाखाली रेल्वे रुळांच्या बाजूला सुरु होते ड्रग्जचे रॅकेट,अखेर पोलिसांनी अशी केली कारवाई
Drug racket
| Updated on: Feb 13, 2026 | 10:10 PM
Share

नवी मुंबई : भंगार विक्रीच्या व्यवसायाच्या नावाखाली अंमली पदार्थांचा रॅकेट चालवणाऱ्या एका टोळीचा नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अड्डा उद्धवस्थ केला आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाने नेरुळ रेल्वे पटरी लगत असलेल्या झोपडीवर धाड टाकून तब्बल 22 लाख रुपयांच्या किंमतीचे हेरॉईन आणि गांजा जप्त केला आहे.तसेच या तस्करीत सहभागी असलेल्या सात आरोपींना अटक करण्याच आली आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने नेरुळ रेल्वे पटरी लगत असलेल्या झोपडीवर धाड टाकून तब्बल 22 लाख रुपये किंमतीचे हिरोईन आणि गांजा जफ्त केला आहे. तसेच या तस्करीत सहभागी असलेल्या सात आरोपींना अटक केली आहे. नेरुळ सेक्टर 28 मधील रेल्वे पटरी जवळ राजू राठोड नावाचा व्यक्ती आपल्या नातेवाईकांच्या मदतीने भंगार विक्रीच्या नावाखाली अमली पदार्थ विकत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली 4 पोलीस अधिकारी आणि 15 पोलीस अंमलदारांच्या पथकाने बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास नेरुळ सेक्टर – 28 मधील रेल्वे रुळालगतच्या संशयीत झोपडीवर छापा टाकला.

22 लाख रुपये किंमतीचा माल जप्त

यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत सदर झोपडीत तब्बल 22 लाख रुपये किंमतीचे 43.6 ग्रॅम हिरोईन तसेच 26 ग्रॅम गांजा आढळुन आला. पोलिसांनी सदरचा गांजा जफ्त करुन अमली पदार्थाच्या तस्करीत सहभागी असलेल्या राकेश सचिन वाघरी (18), राजेंद्र भीमा काळे (55), अनिता संजय पवार (29), राजू बाबू राठोड (28), शिवराम लक्ष्मण पवार (32), कमळाबाई बाबु राठोड (55), सुमन राजू राठोड (25) या 7  जणांना ताब्यात घेऊन असून त्यांच्यावर नेरुळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंगार दुकान अनधिकृत जागेत

अटकेत असलेला मुख्य आरोपी राजू राठोड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नेरुळ पोलीस ठाण्यात मारहाण आणि चोरी आणि घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी राजू राठोड याचे भंगार दुकान अनधिकृत जागेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तातडीने तोडण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवी मुंबई महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी विशाल आणि गंगा काळे या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना