AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Guidelines: रेल्वेत तुपाचा डब्बा नेता येतो? मग अगोदर ही गाईडलाईन अगोदर वाचा

Railway Guidelines Ghee: तुम्ही रेल्वे प्रवासात तुपाचा डब्बा सोबत नेण्याचा विचार करताय का? तर अगोदर रेल्वेची ही नियमावली अगोदर वाचून काढा. त्यानंतर रेल्वे प्रवासात या वस्तू घेऊन जाताना अगोदर विचार करा.

Railway Guidelines: रेल्वेत तुपाचा डब्बा नेता येतो? मग अगोदर ही गाईडलाईन अगोदर वाचा
रेल्वेचा नियम कायImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 13, 2026 | 3:31 PM
Share

Railway Guidelines Ghee: भारतीय रेल्वेने लाखो प्रवासी रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. तिकीट बुकिंग करण्यापासून ते रेल्वेतून सामान नेण्यापर्यंत त्यांची कसरत सुरू असते. पण रेल्वे प्रवासात सामान नेण्याविषयी काही नियम आहेत. त्यानुसार रेल्वे प्रवासात सामान घेण्याविषयी काही नियमांचे पालन करावे लागते. त्यासाठी रेल्वे गाईडलाईन महत्त्वाची आहे. या प्रवासात रेल्वे प्रवासी नेहमी कपडे, खाद्यपदार्थ, सामान आणि इतर घरगुती वस्तू घेऊन जातात. पण त्याविषयीचे नियम त्यांना माहिती नसतात. तूप, तेल, ज्वलनशील पदार्थांची, स्फोटक पदार्थ प्रवासात नेता येत नाही.

पण अनेकांना रेल्वे प्रवासात तुपाचा डब्बा नेता येतो का याविषयीची प्रश्न पडतो. अनेक प्रवाशी त्यांच्या सामानाच्या पिशवीत, बॅगमध्ये तुपाचा डब्बा घेऊन जातात. पण रेल्वे नियमानुसार प्रवासात तूप, तेल खरंच नेता येते का? याविषयीचे मार्गदर्शक सूचना काय आहेत.हे माहिती असेल तर तुमचा प्रवास आरामदायक होईल.

रेल्वेत तुपाविषयीचा काय निर्णय?

भारतीय रेल्वेने तुपाचा डब्बा घेऊन जाण्याचे नियम स्पष्ट आहेत. प्रवाशी ट्रेनमध्ये तूप घेऊन जाऊ शकतात. पण त्याची एक मर्यादा आहे. रेल्वेच्या नियमानुसार, एक प्रवाशी कमाल 20 किलोपर्यंत तुपाचा डब्बा घेऊन जाऊ शकतात. पण त्यासाठी अर्थातच रेल्वे अधिकाऱ्याची, प्रशासनाची पूर्व परवानगी आवश्यक आहे. तुपाचा डब्बा हा चांगला पॅक असावा. तो घट्ट बंद असावा.

पॅकिंग एकदम चांगले हवे. हा तुपाचा डब्बा उघडायला नको. तो सांडायला नको. उघड्या भांड्यात अथवा कमकुवत डब्ब्यात, प्लास्टिक बॉटलमध्ये तूप असायला नको. जर सुरक्षित पॅकिंग नसले तर रेल्वे प्रशासन असा तुपाचा डब्बा जप्त करू शकते. त्यामुळे डब्बा हा योग्यरित्या बंद हवा.

हा नियम कशासाठी ?

तूप हे दिसायला साधं वाटतं. पण ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थ तसेही आणू देत नाहीत. कारण यामुळे जोखिम निर्माण होऊ शकते. जर तूप सांडले तर त्यावर प्रवासी घसरून पडू शकतात. तर तूप हे ज्वलनशील असल्याने आगीचा धोकाही असतो. त्यामुळे पॅकिंगविषयी नियम कडक आहेत. जर 20 किलोंपेक्षा अधिक तूप नेल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे रेल्वेत अशा वस्तू नेण्याअगोदर नियम जाणून घेणे फायदेशीर ठरेल.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा