AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC : बॅट्समन क्रीजच्या बाहेर होता, विकेटकीपरकडून स्टम्पिंग, पण तरीही ICC च्या या नियमामुळे फलंदाज NOT OUT

Oman vs Ireland T20 World Cup 2026 : T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आयर्लंड विरुद्ध ओमान सामन्यात एक हैराण करुन सोडणारी घटना पहायला मिळाली. स्टम्पिंग करुनही फलंदाजाला आऊट दिलं नाही. आयसीसीच्या एका नियमाने फलंदाजाला वाचवलं.

T20 WC : बॅट्समन क्रीजच्या बाहेर होता, विकेटकीपरकडून स्टम्पिंग, पण तरीही ICC च्या या नियमामुळे फलंदाज NOT OUT
oman vs ireland match
| Updated on: Feb 14, 2026 | 2:49 PM
Share

Oman vs Ireland T20 World Cup 2026 : T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 22 वा सामना खूप रोमांचक ठरला. मैदानातील एका आश्चर्यकारक घटनेने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर आयर्लंड आणि ओमानमध्ये सामना सुरु होता. आयर्लंडच्या टीमने पहिली बॅटिंग केली. इनिंगच्या 8 व्या ओव्हरमधील एका स्टम्पिंगने प्रत्येकाला कंफ्यूज केलं. आधी वाटलं फलंदाज आऊट झालाय. पण आयसीसीच्या नियमाने फलंदाजाला वाचवलं.

मॅचची 8 वी ओव्हर सुरु होती. ओमानचा स्पिनर आमिर कलीमने लोर्कन टकरला पाचवा लेंथ बॉल टाकला. टकर पुढे जाऊन फ्लिक करण्याच्या प्रयत्नात चूकला. तो क्रीजच्या बाहेर होता. त्यावेळी विकेटकीपर विनायक शुक्लाने लेग साईडचा चेंडू उत्तमरित्या पकडला. त्यावेळी विकेटकिपर थोडासा घसरला. पण त्याने स्वत:ला संभाळत बेल्स उडवल्या. त्यावेळी फलंदाज बाद झाल्याचं दिसत होतं.

नियम काय सांगतो?

सर्वांना असं वाटलं की टकर आऊट झालाय. कारण तो क्रीजमध्ये परतला नाही. पण अंपायरच्या नजरेने एक गोष्ट हेरली. शुक्लाने, चेंडू ज्या हातात नव्हता, त्याने बेल्स उडवले होते. चेंडू डाव्या हातात होता. पण बेल्स त्याने उजव्या हाताने उडवले होते. क्रिकेट नियमानुसार, स्टम्पिंगच्यावेळी चेंडू ज्या हातात आहे, त्यानेच बेल्स उडवले पाहिजेत. स्टम्पिंग करताना दोन्ही हात परस्परांशी जोडलेले नसतील, चेंडू वेगळ्या हातात असेल, तर ती लीगल स्टम्पिंग मानली जात नाही.

ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सीरीजमध्ये सुद्धा असच घडलेलं

या महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सीरीजवेळी सुद्धा अशीच घटना घडली होती. पाकिस्तानचा लेफ्टी स्पिनर मोहम्मद नवाजच्या चेंडूवर कूपर कोनोली स्टम्पआऊट झाला होता. विकेटकिपर ख्वाजा नफेने लेग साईडला चेंडू पकडलेला व बेल्स उडवलेले. पण चेंडू नफेच्या उजव्या हातात होता. त्यावेळी अंपायरने लक्ष न देता आऊट दिलेलं. खरतर तो फलंदाज नॉटआऊट होता. पण यावेळी अंपायरने योग्य निर्णय दिला.

Follow Us
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...