AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil: माझा भूतकाळ…. गौतमी पाटील पहिल्यांदाच बोलली लाइफ पार्टनर विषयी

नृत्यांगना गौतमी पाटीलने नुकताच एका पॉडकास्टमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या. या वेळी तिने तिला साथीदार कसा हवा हे देखील सांगितले आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

Gautami Patil: माझा भूतकाळ.... गौतमी पाटील पहिल्यांदाच बोलली लाइफ पार्टनर विषयी
Gautami PatilImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 14, 2026 | 3:36 PM
Share

गौतमी पाटील ही लाखो लोकांच्या हृदयाची धडकन आहे. सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतय. ती अनेकांची ‘व्हॅलेंटाईन’ म्हणून ओळखली जाते. तिच्या आकर्षक अदा, ठुमकेदार नृत्य आणि सोज्वळ सौंदर्यामुळे प्रत्येकजण तिच्यावर फिदा आहे. लावणी सादरीकरणातून तिने थोड्याच काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती नेहमी चर्चेत राहते. आता नुकताच गौतमीने केलेले वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आज व्हॅलेंटाईन्स डे साजरा होत असताना, तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे की गौतमीचा खरा व्हॅलेंटाईन कोण? तिला साथीदार नेमका कसा हवा आहे? असे अनेक प्रश्न विचारले जातात. याच विषयावर तिने ‘कॉफी विथ कौशिक’ या खास व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल पॉडकास्टमध्ये मनमोकळेपणाने बोलताना खुलासा केला. आता गौतमी नेमकं काय म्हणाली जाणून घ्या…

गौतमीचा व्हॅलेंटाईन कोण?

जेव्हा तिला विचारण्यात आले की तिचा व्हॅलेंटाईन कोण आहे आणि व्हॅलेंटाईन वीक कसा साजरा करतेय, तेव्हा गौतमीने स्पष्टपणे सांगितले, “सध्या माझा अजिबात कुणीही व्हॅलेंटाईन नाही. माझे कार्यक्रम आणि काम सुरू आहे. व्हॅलेंटाईन डे असं काही मी साजरा करत नाही. यात मला खरंतर फारसा इंटरेस्ट नाही.”

व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करावा?

व्हॅलेंटाईन डे नेमका कसा साजरा करावा, असा प्रश्न आल्यावर गौतमी म्हणाली, “कुठेतरी फिरायला जाऊन, एकत्र छान जेवण करून, एकमेकांसाठी वेळ देऊन… एवढं पुरेसं आहे. त्यातूनच खरा आनंद मिळतो.”

आदर्श पार्टनर कसा असावा?

तिच्या आदर्श साथीदाराबद्दल बोलताना गौतमीने सांगितले, “माझा पार्टनर नेहमी समजूतदार असावा. माझ्या आयुष्यात आतापर्यंत बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. माझ्या भूतकाळाला स्वीकारणारा, समजून घेणारा असावा. हीच माझी मुख्य अपेक्षा आहे.” या मुलाखतीतून गौतमीने तिच्या प्रेम आणि नातेसंबंधांबद्दलची प्रामाणिक मतं मांडली, जी तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडतील!

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा