AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेट्रोच्या कामाचा स्लॅब कोसळताच मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडमध्ये; तत्काळ दिला मोठा आदेश; मृतांच्या वारशांना…

मुंबईत मुलूंड येथे मेट्रोचे काम सुरु असताना स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले वाचा...

मेट्रोच्या कामाचा स्लॅब कोसळताच मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडमध्ये; तत्काळ दिला मोठा आदेश; मृतांच्या वारशांना...
CMImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 14, 2026 | 4:01 PM
Share

मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुलूंड येथे सुरु असलेल्या मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळला आहे. हा स्लॅब दोन गाड्यांवर कोसळला. त्यामुळे या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे. आता यावर दुर्घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी या घटनेची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुंबईतील मुलुंडच्या फायर बिग्रेड जवळ ही घटना घडली. या भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महापौर रितू तावडे यांनी दिली भेट

मुलूंड येथील दुर्घटनेने राज्यात खळबळ माजली आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी ज्या गाड्यांवर स्लॅब कोसळला तो बाजूला करुन बचाव कार्य सुरु केले. या दुर्घटनेमुळे मुलूंड येथील हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या आधी देखील मेट्रो प्रकल्पावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच हा स्लॅब कोसळला आहे.

मेट्रो पुलाचा काही भाग कोसळला आहे. हा स्लॅब कोसळ्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा स्लॅब एका चार चाकी गाडीवर आणि रिक्षावर कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. मुलूंड येथील मेट्रो दुर्घटनेत आणखी कोणी जखमी झाले आहे का? किंवा दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे यावर प्रशासन काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज