उसाचा रस हे पूर्णपणे देशी पेय आहे. ते पिण्याचे अनेक फायदे आहेत.

उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्यासाठी पेय प्यायचे असेल तर उसाचा रस हा उत्तम पर्याय आहे.

उसाच्या रसामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स पोटॅशियम असतात. त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.

उसाचा रस प्रक्रिया न केलेला असून त्यात फिनोलिक आणि फ्लेव्होनॉइड अँटिऑक्सिडंट्स असतात.

उसाच्या रसात पोटॅशियम असते आणि ते शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स टिकवून ठेवते.

शरीराला हायड्रेट ठेवते. त्यामुळे शरीरात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता नसते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उसाचा रस पिणे चांगले नाही. त्यात असलेल्या साखरेचे प्रमाण अचानक रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते.