29 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
सरकारी नोकरी तिही रेल्वेत, भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती मंडळाने स्टेशन मास्तर पदाच्या जागा काढल्या आहेत.
आरआरबीने स्टेशन मास्तर पदासाठी भरती जाहीर केली आहे. तरुणांना रेल्वेत काम करण्याची संधी मिळणार आहे.
भारतीय रेल्वेने १,२६५ जागांची भरती जाहीर केली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २८ ऑक्टोबर २०२६ पासून सुरु झाली आहे. तर २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
या भरती अंतर्गत मुंबई रेल्वे भरती मंडळासाठी सर्वाधिक १७७ जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर जम्मू-श्रीनगर विभागात १२२, तर चेन्नई विभागात ११९ जागा उपलब्ध आहेत.
देशातील विविध विभागात या जागा उपलब्ध असल्याने पात्र उमेदवारांना वेगवेगळ्या रेल्वे विभागांसाठी संधी मिळणार आहे.
या भरतीसाठी सविस्तर माहिती अधिकृत https://www.rrbapply.gov.in संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२६ आहे.