सरकारी नोकरी मिळवण्याचा अनेक युवकांचा प्रयत्न असतो. बारावी उत्तीर्ण युवकांसाठी चांगली संधी आहे. 

12 July 2025

इंडियन कोस्ट गार्डने असिस्टेंट कमांडेंट पदासाठी अर्ज मागवले आहे. इंडियन कोस्ट गार्ड एकूण 170 जागा भरणार आहेत.

उमेदवार असिस्टेंट कमांडेंट पदासाठी ऑफिशियल वेबसाइट joinindiancoastguard.cdac.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

असिस्टेंट कमांडेंट पदासाठी अर्ज 8 जुलैपासून सुरु झाले आहे. युवकांना 23 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

उमेदवारांना अर्जाबरोबर 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. कमीत कमी वय 21 वर्ष तर जास्तीत जास्त वय 25 वर्ष असावे.

नोटिफिकेशननुसार, मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत 60% टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी पात्र ठरणार आहे. बारावीत त्यांचा भौतिकशास्त्र अन् गणित विषय हवा. 

नोटिफिकेशननुसार, असिस्टेंट कमांडेंट पदावर निवड झाल्यावर 56,100 रुपये पगार मिळणार आहे. डिप्टी कमांडेंटपदासाठी 67,700 रुपये पगार असेल.

कमांडेंटपदासाठी (JG):78,800 रुपये दर महिन्याला पगार असणार आहे. कमांडेंट पदासाठी 1,23,100 रुपये पगार असेल.