16 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
इंग्लंडमध्ये द हंड्रेड स्पर्धा सुरू असून 17 वर्षीय फिरकीपटू दिली कॉर्टनी कोलमनने कमाल केली.
सदर्न ब्रेवसाठी खेळताना डावखुऱ्या फिरकीपटूने ट्रेंट रॉकेट्सच्या फलंदाजांना जाळ्यात ओढलं. एकूण 4 विकेट घेतल्या.
कोलमनने 20 चेंडूंच्या विशेष स्पेलमध्ये 14 चेंडू निर्धाव टाकले आणि चार विकेट घेतल्या. तिच्या सहा चेंडूवर फक्त 13 धावा आल्या.
कोलमननंतर वेगवान गोलंदाज लॉरेन बेलने तीन विकेट घेतल्या. या स्पर्धेत 50 विकेट घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली.
बेलने कोलमनसह अशी भेदक गोलंदाजी केली की, ट्रेंट रॉकेट्सने फक्त 55 धावांवर 8 विकेट गमावल्या.
शेवटी एलाना किंगने नाबाद 24 आणि ख्रिस्टी गॉर्ड़ने 32 धावा केल्या. नवव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. तर संघ 106 धावांवर बाद झाला.
सदर्न ब्रेवने हा सामना 6 विकेट राखून जिंकला. यात माया बूशिएने 40 आणि सोफी डिवाइनने 41 धावा केल्या.