लॉर्ड्समध्ये टीम इंडियाला विजयी करणारे 3 कर्णधार

9 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

इंग्लंड-इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा 10 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे.

या कसोटी सामन्याचं आयोजन हे लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे.

भारताने आतापर्यंत या मैदानात एकूण 19 कसोटी सामने खेळले आहेत. 

भारताला या 19 पैकी फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. 

कपिल देव यांनी त्यांच्या नेतृत्वात भारताला 1986 साली या मैदानात पहिला कसोटी विजय मिळवून दिला होता.

त्यानंतर महेंद्रसिंह धोनी याने त्याच्या नेतृत्वात भारताला 2014 साली लॉर्ड्समध्ये विजयी केलं होतं.

तर भारताने लॉर्ड्समधील तिसरा आणि शेवटचा विजय हा 2021 साली विराट कोहलीच्या नेतृत्वात मिळवला होता.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या