अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली

20 डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

भारताने पाचवा टी 20i सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 3-1 ने नावावर केली. हे वर्ष ओपनर अभिषेक शर्मासाठी खास राहिलं.

अभिषेकने पाचव्या सामन्यात 34 धावा केल्या. अभिषेकने यासह टी 20 क्रिकेटमध्ये 2025 वर्षात एकूण 1602 धावा केल्या. 

अभिषेकने 2025 मध्ये 41 टी 20i सामन्यांत 859 धावा केल्या. तर अभिषेकने उर्वरित धावा या ipl आणि smat स्पर्धेत केल्या.  

अभिषेकने 2025 मध्ये एकूण 3 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली.  मात्र अभिषेक विराटचा रेकॉर्ड ब्रेक करण्यापासून अवघ्या 13 धावांनी दूर राहिला.

अभिषेकची एका वर्षात सर्वाधिक टी 20 धावा करण्याची संधी हुकली. हा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे.

विराट कोहली याने 2016 साली टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 1 हजार 614 धावा केल्या होत्या.

अभिषेकने आणखी 13 धावा केल्या असत्या तर तो विराटला पछाडून एका वर्षात सर्वाधिक टी 20 धावा करणारा फलंदाज ठरला असता. मात्र तसं झालं नाही.