मोहम्मद नबीचा वयाच्या 40 व्या वर्षी कारनामा, ठरला पहिलाच फलंदाज

15 ऑक्टोबर 2025

Created By:  संजय पाटील

अफगाणिस्तानने बांगलादेश विरूद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 293 धावा केल्या.

अफगाणिस्तानचा अनुभवी फलंदाज मोहम्मद नबी  याने ऐतिहासिक खेळी करत 10 वर्ष जुना रकॉर्ड ब्रेक केला. 

नबीने या सामन्यात 37 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 62 रन्स केल्या. 

नबी यासह वनडे क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वात वयस्कर फलंदाज ठरला. नबीने पाकिस्तानच्या  युनिस खानचा रेकॉर्ड ब्रेक केला. 

नबीने वयाच्या 40 वर्ष 286 व्या दिवशी ही कामगिरी केली. तर युनिसने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 40 वर्ष 283 व्या दिवशी अर्धशतक केलं होतं.

नबीने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धमाका केला. अफगाणिस्तानने शेवटच्या 2 षटकांत 44 धावा केल्या त्यात 38 धावांचं योगदान नबीचं होतं.

नबीने अफगाणिस्तानचं 176 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 18 अर्धशतकांसह 3 हजार 762 धावा केल्या आहेत.

श्रीदेवीच्या सावत्र लेकीचा साखरपुडा; आईच्या फोटोसमोर घातली अंगठी