सारासोबतचा फोटो आणि Love You अशी  कॅप्शन, कोण आहे ती व्यक्ती?

12 ऑक्टोबर 2025

Created By:  संजय पाटील

दिग्गज माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लेक सारा 12 ऑक्टोबरला 28 वर्षांची झाली. साराचा आजच्याच दिवशी 1997 साली मुंबईत जन्म झाला होता.

साराला वाढदिवसानिमित्ताने तिच्या मित्रांनी शुभेच्छा दिल्या. साराची खास मैत्रीण अलिशा हीने देखील शुभेच्छा दिल्या.

अलिशाने इंस्टावर सारासोबतचे 2 स्टोरी पोस्ट केल्यात. "हॅप्पी बर्थडे माय गर्ल!" असं कॅप्शन अलिशाने एका स्टोरीला दिलं आहे.

तसेच अलिशाने सारासोबतचा दुसरा फोटो पोस्ट केला आहे. यात अलिशाने साराला मिठी मारली आहे. तसेच "लव यू" असं कॅप्शन दिलं आहे.

सारा आणि अलीशा या दोघीही बालपणीच्या मैत्रीणी आहेत. दोघीही 23 वर्षांपासून एकत्र आहेत. 

सारा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सारा सचिन तेंडुलकर फाउंडेशनची संचालिका आहे. तसेच साराने मुंबईत नुकतंच पिलाटे स्टुडिओची सुरुवात केली आहे.    

साराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. साराचे इस्टांग्रामवर 8.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.

श्रीदेवीच्या सावत्र लेकीचा साखरपुडा; आईच्या फोटोसमोर घातली अंगठी