अनाया बांगरला व्हायचंय आई..! पण कसं ते तिने सांगून टाकलं

26 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

सोशल मीडियावर अनाया बांगर खूपच सक्रिय असते. कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

अनाया बांगरने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने आई होण्याबाबत वक्तव्य केलं आहे. 

अनाया या व्हिडीओत एका मित्रासोबत गेम खेळताना दिसत आहे. यात काही विचित्र प्रश्न विचारले गेले. 

या व्हिडीओत अनाया बांगरला मैत्रिणीने विचारलं की, 'मुलांशिवाय लग्न की लग्नाशिवाय मुले'

अनायाने या प्रश्नाचं उत्तर दिलं की, लग्नाशिवाय मुले...

अनायाला विचारलं की, तू तुझ्यापेक्षा लहान असलेल्या एखाद्याला डेट करशील का? तेव्हा तिने उत्तर दिलं नाही.

अनायाला तिच्या मैत्रिणीने विचारलं की, तुमच्या जोडीदाराचा फोन तपासणे योग्य आहे का? तेव्हा तिने हो असं उत्तर दिलं.

घरातील झुरळांचा सुळसुळाट संपण्याचे सहा प्रभावी मार्ग, जाणून घ्या