21 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
स्वयंपाक घरात झुरळांचा वावर दिसला की काही खाणंही जीवावर येतं. त्यामुळे त्यांना पळवण्यासाठी उपाय केले जातात. आज आम्ही तुम्हाला काही प्रभावी उपाय सांगतो.
पुदिन्याच्या पानांचा वास खूप तीव्र असतो. हा वास झुरळांना आवडत नाही. त्यामुळे पुदिन्याचे तेल पाण्यात मिसळून घराभोवती फवारू शकता.
झुरळांना पळवून लावण्यासाठी तुन्ही कडुलिंबाचं तेल किंवा पावडर वापरू शकता. झुरळांचा वावर असलेल्या ठिकाणी फवारणी करा.
लसूण, कांदा आणि काळीमिरी बारीक करून पाण्यात उकळा. थंड झाल्यावर बाटलीत भरा आणि मग स्प्रे करा. हा उपाय प्रभावी ठरेल.
तमालपत्राचा वास तीव्र असतो. तमालपत्र बारीक करून दरवाजे, कपाट आणि कोपऱ्यात ठेवा. त्यामुळे झुरळं पळून जातात.
लिंबाच्या रसात सायट्रिक एसिड असते. त्यामुळे झुरळं पळून जातात. लिंबाचा रस पाण्यात मिसळा आणि फवारणी करा. झुरळं पळून जातील.
झुरळांना व्हिनेगरचा वासही आवडत नाही. व्हिनेगर आणि पाणी समान मिसळा. त्याचा स्प्रे करा. झुरळं पळून जातील.