श्रेयस अय्यर पुन्हा अनलकी, पण वर्षभरात असं कमावलं नाव

19 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

श्रेयस अय्यरला आशिया कप 2025 स्पर्धेत टीम इंडियात जागा मिळाली नाही. 

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अजित आगरकर यांनी सांगितलं की, अय्यरने काहीच चुकीचं केलं नाही. पण त्याला थोडी वाट  पाहावी लागेल. 

श्रेयस अय्यरने 2024 या वर्षात पाच मोठे किताब आपल्या नावावर केले. त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. 

श्रेयस अय्यरने 2024 मध्ये रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आहे. 

श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात कोलकाता नाईट रायडर्स संघ 2024 आयपीएल जेतेपदाचा मानकरी ठरला.

अय्यरच्या नेतृत्त्वात मुंबई संघाने इराणी कप 2024 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं.

श्रेयस अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. त्याने सर्वाधिक 243 धावा केल्या. 

अनाया बांगर दिसणार नव्या भूमिकेत, अखेर घेतला मोठा निर्णय