13 November 2025
Created By: Atul Kamble
माजी क्रिकेटपटू आणि कोच संजय बांगर यांची कन्या अनायाने जेंडर चेंज सर्जरीनंतर पुन्हा एकदा मैदानावर आगमन केले आहे. जेंडर चेंज करण्याआधी ती आर्यन बांगर होती.
अनायाने मुलगा असताना मुंबईसाठी अंडर-१६ टीमसाठी क्रिकेट खेळले आहे. आता ती पुन्हा मैदानात उतरणार आहे. तिने इंस्टाग्रामवर काही व्हिडीओही पोस्ट केले आहेत.
अनाया बांगरने अलिकडेच फलंदाजी करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.तिच्या अकाऊंट फलंदाजीचे अनेक व्हिडीओ आहेत. परंतू तिने आता खुलासा केलाय की गोलंदाजही आहे.
अनायाने लेटेस्ट व्हिडीओ शेअर केला आहे त्यात ती फलंदाजी करताना दिसत आहे. तिने त्यात लिहीलंय की 'मी डाव्या हाताने स्पिन गोलंदाजीही करते'
अनाया बांगर हीचे क्रिकेटशी जुने नाते आहे. तिने ज्युनियर लेव्हलला यशस्वी जायसवाल,सरफराज खान आणि मुशीर खान सारख्या खेळाडूंसोबत क्रिकेट खेळली आहे.
अनायाचा अलिकडे फलंदाजी करतानाचा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता. त्यात तिने नेट्समध्ये एकाहून एक बेस्ट शॉट्स लावले आहेत.