भारतीय संघात संधी मिळालेला अंशुल कंबोज कोण आहे?

20 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. रिपोर्ट्सनुसार, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर पडला आहे.

तसेच वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि विकेटकीपर ऋषभ पंत या दोघांनाही दुखापत आहे. मात्र दोघेही चौथ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

इंग्लंड विरूद्धच्या उर्वरित 2 सामन्यांसाठी भारतीय संघात अंशुल कंबोज याचा समावेश करण्यात आला आहे.

अंशुल कंबोज वेगवान गोलंदाज आहे. अंशुलला बॅटिंगही करु शकतो. 

अंशुल इंडिया ए साठी इंग्लंड लायन्स विरुद्ध 2 फर्स्ट क्लास सामने खेळला होता. अंशुलने त्या सामन्यांत फलंदाजांना बॉलिंगने त्रास दिला होता.

24 वर्षीय अंशुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरयाणाचं प्रतिनिधित्व करतो.

अंशुलने आतापर्यंत 24 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 486 रन्स करण्यासह 79 विकेट्स घेतल्या आहेत.

अंशुल कंबोजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 1 अर्धशतकही केलं आहे.

अंशुल आयपीएलच्या 18 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. अंशुलला सीएसकेसाठी 8 सामने खेळण्याची संधी मिळाली. 

तसेच अंशुलने आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 3 सामन्यांमध्ये 2 विकेट्स घेतल्या होत्या.

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?