24 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील एशेस सीरिजमधील पहिला सामना अवघ्या 2 दिवसांत निकाली निघाला.
पर्थमध्ये हा सामना खेळवण्यात आला. यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला या सामन्यात 8 विकेट्सने पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
हा ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आलेला दुसरा सर्वात छोटा सामना ठरला. या सामन्याचा निकाल 850 चेंडूंआधीच लागला.
या सामन्यात 2 दिवसांत 847 चेंडू टाकण्यात आले. तसेच दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकूण 32 विकेट्स मिळवल्या.
ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात 1932 साली खेळवण्यात आलेल्या सामन्याचा निकाल हा 656 चेंडूंत लागला होता.
मिचेल स्टार्क याने या सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. स्टार्क यासह एशेस सीरिजमध्ये 35 वर्षांनंतर 10 विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला गोलंदाज ठरला.
ट्रेव्हिस हेड याने या सामन्यात शतक केलं. हेड यासह ऑस्ट्रेलियासाठी तिसरं वेगवान शतक करणारा फलंदाज ठरला. हेडने 69 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या.