5 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
इंग्लंडचा फलंदाज जो रुट याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाचव्या कसोटीत सिडनीत शतक झळकावलं.
जो रुट याने 242 चेंडूत 160 धावा केल्या. रुटने यासह काय काय केलं? हे जाणून घेऊयात.
जो रुट 2026 या वर्षात आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा पहिला फलंदाज ठरला.
रुटची 150 पेक्षा अधिक धावा करण्याची ही 17 वी वेळ ठरली. रुटने यासह महेला जयवर्धने याला मागे टाकलं.
रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 41 वं शतक ठरलं. रुट यासह कसोटीत सर्वाधिक शतकं करणारा संयुक्तरित्या तिसरा फलंदाज ठरला.
जो रुट याचं सिडनीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. तसेच रुटचं ऑस्ट्रेलियातील हे रेड बॉलमधील पहिलं शतक ठरलं.
जो रुट इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज होताच. रुटने शतक करत त्या आकड्यात वाढ केली आहे.