6 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
भारताने ऑस्ट्रेलियावर चौथ्या टी 20i सामन्यात विजय मिळवला. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.
भारताने या सामन्यात 167 धावा केल्या. त्यानंतर कांगारुंना 119 रन्सवर ऑलआऊट करत भारताने सामना जिंकला.
ऑलराउंडर अक्षर पटेल याने या विजयात प्रमुख भूमिका बजावली. अक्षरने निर्णायक 21 धावा केल्या. तसेच 2 विकेट्सही मिळवल्या.
अक्षरने बॅटिंग आणि बॉलिंगने केलेल्या दुहेरी कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारने गौरवण्यात आलं. यासह त्याने युवराज सिंह याला पछाडलं.
अक्षरची टी 20i क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याची आठवी वेळ ठरली. अक्षरने यासह युवराजला मागे टाकलं. युवराज 7 वेळा POTM ठरला होता.
तसेच अक्षर पटेल भारतासाठी सर्वाधिक POTM जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी पोहचला आहे.
या यादीत संयुक्तरित्या विराट आणि सूर्या विराजमान आहेत. दोघांनी प्रत्येकी 16 वेळा ही कामगिरी केली. तर रोहित दुसर्या स्थानी आहे.