25 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
ऑस्ट्रेलियात फर्स्ट क्लास डेब्यू करणाऱ्या भारतीय वंशाच्या निखील चौधरी याने शतक झळकावत धमाका केला आहे.
निखीलने शेफील्ड शील्ड स्पर्धेत तस्मानियाकडून खेळताना न्यू साऊथ वेल्स विरुद्ध 163 धावांची खेळी केली.
निखीलने पहिलंच शतक शानदार पद्धतीने झळकावलं. निखीलने 184 बॉलमध्ये 5 सिक्ससह शतक पूर्ण केलं.
निखीलचा जन्म दिल्लीत झाला होता. निखीलने पंजाबचं विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत प्रतिनिधित्व केलं आहे.
निखीलने 2020 साली भारत सोडलं आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला. निखील आता ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे.
निखीलने आयपीएल स्पर्धेत खेळावं अशी इच्छा भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंह याची आहे. अर्शदीपने निखीलसाठी पंजाब किंग्ससोबत बोलणंही केल्याचं म्हटलं जात आहे.
निखील बीबीएल स्पर्धेत होबार्ट हेरीकेन्सचं प्रतिनिधित्व करतो. निखीलने टीम डेव्हिड आणि इतर खेळाडूंसह टीमला जिंकवलं आहे.