8 ऑक्टोबर 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे.
एकदिवसीय मालिकेने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्याआधी स्टार खेळाडूला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी वेगवान गोलंदाज नॅथन एलिस आणि कोनी एडवर्ड्स यांना पुत्ररत्न प्राप्त झालंय.
नॅथन एलिसने ही गोड बातमी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. नॅथनच्या मुलाचा फोटो व्हायरल झाला आहे.
नॅथन एलिस आणि कोनी एडवर्ड्स हे दोघे 28 जुलै 2023 रोजी विवाहबद्ध झाले होते.
नॅथन एलिस याची टीम इंडिया विरूद्धच्या वनडे आणि टी 20I या दोन्ही मालिकांसाठी निवड करण्यात आली आहे.
नॅथन एलिस याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचं 15 एकदिवसीय आणि 27 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.