19 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. त्यातला पहिला सामना गॉलमध्ये सुरु आहे.
श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या कसोटी क्रिकेटचा हा शेवटचा सामना आहे. जेव्हा मॅथ्यूज फलंदाजीला उतरला तेव्हा बांगलादेशने गार्ड ऑफ ऑनर दिलं.
अँजेलो मॅथ्यूजने श्रीलंकेसाठी पहिल्या डावात 39 धावा केल्या. त्याला मोमिनुल हकने आऊट केलं.
बांगलादेशने एकदा अँजेलो मॅथ्यूजला टाइम आऊट केलं होतं. पण शेवटी आठवणीत राहील असा निरोप दिला.
वर्ल्डकप 2023 दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज टाइम आउट झाला होता.
मॅथ्यूज हेल्मेट मागवताना उशीर करून बसला आणि शाकिब अल हसनने अपील केली. त्यानंतर पंचांनी टाइम आऊट दिलं.
38 वर्षीय मॅथ्यूजने 2009 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. ही त्याची 119 वी कसोटी आहे.