कॅल्शियमची उणीव दूर करण्यासाठी हे पदार्थ खा! जाणून घ्या

18 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

कॅल्शियम हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी खूपच महत्त्वाचं आहे. स्नायू, नसा आणि हृदयाच्या कार्यात देखली मदत करतात. 

कॅल्शियमची उणीव असल्यास हाडे कमकुवत, स्नायूंची दुखापत, अकाली दात किडणे, ठिसूळ नखं, थकवा, मुलांची वाढ मंदावणे आणि हृदयाच्या गतीवरही परिणाम होऊ शकतो. 

शरीरातील कॅल्शियमची उणीव दूर करणं खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे काही पदार्थ खाणं खूप फायदेशीर ठरतं. जाणून घ्या

आहारतज्ज्ञ अनामिका गौर यांनी सांगितलं की, दूध, दही आणि चीजमध्ये भरपूर कॅल्शियम असते. त्यामुळे रोज एक ग्लास दूध किंवा एक वाटी दही खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. 

पालक, मेथीसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियम असते. या भाज्यांचा आहारात समावेश करा.

तिळामध्येही भरपूर कॅल्शियम असते. सोया मिल्क आणि टोफूमध्येही कॅल्शियम असते. त्याचे सेवन केल्याने कॅल्शियमची पातळी वाढते. 

मासे आणि अंडी देखील कॅल्शियमचा स्त्रोत आहेत. त्यात व्हिटॅमिन डी आहे. त्यामुळे शरीरात कॅल्शियम योग्यरित्या शोषण्यास मदत करते.

युरिक एसिड वाढलं असेल तर हे पदार्थ खाणं टाळा