युरिक एसिड वाढलं असेल तर हे पदार्थ खाणं टाळा

18 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

युरिक एसिड हा रासायनिक पदार्थ असून शरीरात प्युरीन नावाच्या घटकाच्या विघटनाने तयार होतो. अन्न आणि पेयांमधून प्युरीन मिळते. पेशींमध्ये देखील आढळते. एसिड रक्तात विरघळतं आणि मूत्रपिंडाद्वारे मूत्रातून बाहेर टाकलं जातं.

जेव्हा एखादी व्यक्ती प्युरीन असलेले पदार्थ जास्त खाते तेव्हा शरीरात प्युरीन तयार होते. तेव्हा मूत्रपिंड ते योग्यरित्या उत्सर्जित करू शकत नाही. तेव्हा रक्तातील यूरिक एसिडचे प्रमाण वाढते. 

यूरिक एसिड वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत काही गोष्टींचं सेवन करणं टाळलं पाहीजे.

डॉ. दीपक सुमन यांच्या मते, मटणात भरपूर प्युरिन असते. ते शरीरात युरीक एसिडची पातळी वाढवते.

बियरमध्येही प्युरिन असते आणि अल्कोहोल यकृतावर परिणाम करते. यामुळे यूरिक एसिड काढण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे शरीरात युरिक एसिड जमा होते. 

डाळी पौष्टिक असल्या तरी चणे, राजमा, वाटाणे आणि मसूरमध्ये प्युरिन असते. यामुळे युरिन एसिड वाढल्यास त्याचं सेवन मर्यादित करावं. 

कोल्ड्रिंग्स, पॅकबंद ज्यूस आणि साखरेचं प्रमाण असलेल्या पदार्थांमध्ये फ्रुक्टोज असते. यामुळे युरिक एसिडची पातळी वाढते. यामुळे यापासून दूर राहणं आवश्यक आहे. 

कॅल्शियमची उणीव दूर करण्यासाठी हे पदार्थ खा! जाणून घ्या