IND vs SA : टीम इंडियातून चौघांचा पत्ता कट, कोण आहेत ते?

23  नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

टीम इंडियात 4 खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. या चौघांमध्ये ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड,  रवींद्र जडेजा आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे. 

ऋतुराजने 2023 साली अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. ऋतुराजला दक्षिण आफ्रिका ए विरूद्धच्या कामगिरीमुळे भारतीय संघात संधी मिळाली.

तर अक्षर पटेल आणि संजू सॅमसन या दोघांना एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत धारदार बॉलिंगने प्रतिस्पर्धी संघाला ढेर करणाऱ्या मोहम्मद शमी यालाही संधी मिळाली नाही.

भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. 

भारताचा अनुभवी फलंदाज आणि विकेटकीपर केएल राहुल याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.