बॉलिवूडचा किंग म्हणजे शाहरुख खान सुयशचा दिवाना झालाय. 

IPL 2024 मध्ये KKR ची टीम जबरदस्त खेळतेय. शाहरुख प्रत्येक मॅचसाठी स्टेडियमवर हजर असतो.

शाहरुख मॅचनंतर खेळाडूंना भेटतो. अशाच एका भेटीत त्याला लेग स्पिनर सुयश शर्माची हेअरस्टाइल  आवडली.

सुयशशी बोलताना त्याने मॅनेजर पूजा डडलानीला बोलावलं. सांगितलं की,  त्याला सुद्धा अशी  हेअरस्टाइल पाहिजे.

सुयश शर्मा सुद्धा लांब केस ठेवायचा. आता त्याने  हेअर कट केलाय.

सुयशला यावर्षी एका सामन्यातच संधी मिळालीय. त्यात तो कमाल दाखवू शकलेला नाही.

IPL 2024 मध्ये KKR दुसऱ्या नंबरवर आहे. 5 पैकी  4 सामने त्यांनी जिंकलेत.