भारत आणि न्यूझीलंड दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना झाला. त्यात भारताने विजेतेपद मिळवले.
11 March 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीत २५ वर्षांपूर्वी दोन्ही देशांत अंतिम सामना झाला होता. त्यात न्यूझीलंडने विजेतेपद मिळवले होते. त्या विजेतेपदाचा हिरो ख्रिस केर्न्स होता.
ख्रिस केर्न्स हा न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8273 धावा केल्या आणि 420 विकेट्सही घेतल्या.
ख्रिस केर्न्सने 2000 साली न्यूझीलंडसाठी पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्याने नाबाद शतक झळकावून भारताचे विजेतेपदाचे स्वप्नावर पाणी फेरले.
ख्रिस केर्न्स हा न्यूझीलंडच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक होता. पण त्याच्यावर आयसीएलमध्ये मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप झाले होते, त्यानंतर त्याची आर्थिक स्थिती खूपच खराब झाली होती.
आर्थिक संकटामुळे ख्रिस केर्न्स याने सर्व काही विकले होते. त्याला आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी ऑकलंडमधील बसेस धुण्याचे काम करावे लागले.
ख्रिस केर्न्सला ऑकलंड कौन्सिलने नोकरी दिली होती. त्यात त्याला ट्रक चालवण्याचे आणि बस स्टॉपवर पाणी मारण्याचे काम करावे लागत होते. न्यूझीलंड बोर्ड आपल्या माजी खेळाडूंना पेन्शन देखील देत नाही.
ख्रिस केर्न्सला कॅन्सरसारख्या गंभीर आजार झाला. त्याला हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यामुळे त्यांना अर्धांगवायू झाला होता.
ख्रिस केर्न्सची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्याला पाच मुले आहेत. त्याची पत्नी देखील बास्केटबॉल खेळाडू आहे.