तब्बल 7 वर्षांनी या टुर्नामेंटमध्ये  रोहित शर्मा खेळणार

12 November 2025

Created By: Atul Kamble

गेल्या काही वर्षांपासून घरगुती क्रिकेटमध्ये बीसीसीआय कठोर धोरण राबवत आहे.अलिकडेच बीसीसीआयने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना घरगुती क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले

 एका रिपोर्ट नुसार बीसीसीआयने रोहित आणि विराटला घरगुती वनडे मालिका, विजय हजारे ट्रॉफीत सहभाग घेण्यास सांगितले आहे. यात टुर्नामेंटची सुरुवात 24 डिसेंबरपासून होत आहे.

 या आदेशानंतर रोहितने विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याचे मन केले आहे. त्याने मुंबई क्रिकेट संघास या संदर्भात सांगितले आहे.

रोहित शर्मा हा त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन होणार आहे. तो सात वर्षे या स्पर्धेतील एकही मॅच खेळला नव्हता.

रोहित शेवटचा ऑक्टोबर 2018  मध्ये विजय हजारे ट्रॉफीत खेळला होता. त्याने 2018-19 टुर्नामेंटमध्ये मुंबईसाठी दोन मॅच खेळला होता. या सिजनमध्ये मुंबई संघाने विजय मिळवला होता

विजय हजारे ट्रॉफी डोमेस्टीक कॅलेंडरमध्ये होणारी एकमेव वनडे टुर्नामेंट आहे. अशात टेस्ट आणि टी-20 मधून निवृत्ती घेणाऱ्या रोहितसाठी ही टुर्नामेंट महत्वाची आहे.