चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याचं खास 'शतक'
8 May 2025
Created By: Sanjay Patil
महेंद्रसिंह धोनी याने आयपीएलमध्ये ऐतिहासिक शतक केलं आहे, धोनीच्या नावावर यासह खास विक्रमाची नोंद झाली आहे
धोनीने हे शतक धावांबाबत नाही तर, नॉट आऊट राहण्याबाबत केलं आहे
महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक 100 वेळा नॉट आऊट राहणारा पहिला फलंदाज ठरला आहे
धोनीने 7 मे रोजी केकेआर विरुद्ध नाबाद 17 धावा केल्या, धोनीची ही नॉट आऊट राहण्याची 100 वी वेळ ठरली
धोनीने केकेआर विरुद्ध विकेटकीपर म्हणून आणखी एक विक्रम केला, धोनीने स्टंपमागून 200 फलंदाजांना आऊट केलं
धोनीने 270 आयपीएल सामन्यांमध्ये 200 फलंदाजांना स्ंटपमागून आऊट करण्याची कामगिरी केली
धोनीने आयपीएलमध्ये विकेटकीपर म्हणून 153 कॅच घेतल्या तर 47 फलंदाजांना स्टंपिंग आऊट केलं
क्रेडिट कार्ड काही मिनिटात UPI ला लिंक करा! असे मिळतात फायदे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा