4 फोर-4 सिक्स, वैभव सूर्यवंशीची धोनीच्या CSK विरुद्ध वादळी खेळी
20 मे 2025
Created By: संजय पाटील
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने सीएसके विरुद्ध 57 धावांची विजयी खेळी केली.
वैभव सूर्यवंशी याने 188 धावांचा पाठलाग करताना 57 धावा केल्या. वैभवने या खेळीत 40 धावा या फोर आणि सिक्सच्या मदतीने केल्या
वैभव सूर्यवंशी याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 4 सिक्स 4 फोर लगावले. वैभवने 172.73 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
वैभवने केलेल्या खेळीमुळे राजस्थानने सहज विजय मिळवला. राजस्थानने यासह आयपीएल 2025 मधील मोहिमेचा शेवट विजयाने केला.
वैभवने आयपीएलच्या 18 व्या मोसमातून वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी पदार्पण केलं. वैभव आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला.
वैभवला आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचं 7 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली
वैभवने या 7 सामन्यांमध्ये 206.56 च्या स्ट्राईक रेटने आणि 36.00 च्या सरासरीने 1 शतक आणि 1 अर्धशतकासह एकूण 252 धावा केल्या.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा