30 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेची सुरुवात नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन विरुद्ध नॉर्थ ईस्ट झोन या 2 सामन्यांनी झाली.
या 2 सामन्यांमधील पहिल्या 3 दिवसात 5 फलंदाजांनी शतकं झळकावली.
सेंट्रल झोन टीमने सर्वाधिक 3 शतकं झळकावली. कॅप्टन रजत पाटीदार याने 80 बॉलमध्ये शतक केलं. रजतने 125 धावा केल्या.
पाटीदार व्यतिरिक्त पहिल्या डावात दानिश मालेवार यानेही शतक ठोकलं. दानिशने पदार्पणात द्विशतक ठोकलं. दानिशने 203 धावा केल्या.
त्यानंतर सेंट्रल झोनसाठी दुसर्या डावात शुभम शर्मा याने 122 धावांची खेळी केली.
तसेच नॉर्थ झोनकडून एकालाही शतक करता आलं नाही. मात्र दुसऱ्या डावात अंकीत कुमार याने 168 धावा केल्या.
तसेच युवा यश धुळ यानेही दुसऱ्या डावात शतक ठोकलं. यशने 133 धावांची खेळी केली.