27 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणआर आहे. असं असताना टी20 पॉवरप्लेमध्ये डॉट चेंडू टाकणाऱ्या खेळाडूंची चर्चा रंगली आहे. यात भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहाचं नाव आघाडीवर आहे.
भुवनेश्वर कुमारने आशिया कप टी20 पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक 54 निर्धाव चेंडू टाकले आहेत.
जसप्रीत बुमराहनेही भुवनेश्वर कुमार सारखेच 54 निर्धाव चेंडू टाकले आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर नुवान कुलशेखरा येतो. त्याने 42 निर्धाव चेंडू टाकले आहेत.
चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा हारिस रऊफ येतो. त्याने पॉवरप्लेमध्ये 33 चेंडू निर्धाव टाकले आहेत.
युएईच्या अमजद नावेदनेही हारिस रउफ प्रमाणे कामगिरी केली आहे. त्यानेही 33 चेंडू निर्धाव टाकले आहेत.
आशिया कप स्पर्धेचं हे 17वं पर्व असून पुढच्या महिन्यात युएईत ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये खेळली जाईल.