शुबमनची मँचेस्टरमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी, पाकिस्तानच्या युनूस खानला पछाडलं
26 जुलै 2025
Created By: संजय पाटील
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याचा इंग्लंड दौऱ्यात धावा करण्यासह अनेक रेकॉर्ड ब्रेक करण्याचा झंझावात कायम आहे.
शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात असंख्य रेकॉर्ड केले.
शुबमनने पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात एकूण 3 शतकं केली. मात्र शुबमन तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला.
शुबमनने मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या डावात कमबॅक केलं आणि मोठा रेकॉर्ड केला
शुबमन गिल इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे.
दुसऱ्या डावात 13 धावा करताच शुबमन इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला.
शुबमनने यासह पाकिस्तानचा माजी फलंदाज युनिस खान याचा रेकॉर्ड ब्रेक केला. यूनिस खान याने 2006 मध्ये 7 डावांत 631 धावा केल्या होत्या.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा