रवींद्र जडेजाचा इंग्लंडमध्ये महारेकॉर्ड, VVS Laxman याचा 23 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

2 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

ऑलराउंडर रवींद्र जडेजाने याने ओव्हल कसोटीतही चाबूक बॅटिंग केली आणि भारतीय चाहत्यांची मनं जिंकली

जडेजाने टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात 77 चेंडूत 53 धावा केल्या.

जडेजाने या अर्धशतकी खेळीत 7 चौकार लगावले. जडेजाने या खेळीसह मोठा विक्रम मोडीत काढला.

जडेजा कसोटी मालिकेत 6 किंवा त्याखालच्या स्थानावर येऊन सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 

जडेजाने याबाबतीत भारताचा माजी फलंदाज 'संकटमोचक' व्हीव्हीएस लक्ष्मण याचा 23 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 

लक्ष्मणने 2002 साली विंडीज विरुद्ध कसोटी मालिकेत 474 धावा केल्या होत्या.

जडेजाने इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांमधील 10 डावांत 86 च्या सरासरीने एकूण 516 धावा केल्या.

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या