कमनशिबी शुबमन गिल, विराटनंतर ठरला पहिलाच कर्णधार, नक्की काय झालं?
31 जुलै 2025
Created By: संजय पाटील
इंग्लंडने केनिंग्टन ओव्हलमधील पाचव्या कसोटीत भारताला फलंदाजांसाठी भाग पाडलं.
भारताचा कर्णधार शुबमन गिल याला या कसोटी मालिकेत एकदाही टॉस जिंकता आला नाही. पाचही वेळा इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही 14 वी वेळ आहे जेव्हा कर्णधार मालिकेत एकदाही टॉस जिंकू शकला नाही.
तसेच 21 व्या शतकातील ही दुसरीच वेळ आहे जेव्हा कर्णधार 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकदाही टॉस जिंकू शकला नाही.
शुबमन आधी या शतकात विराट कोहली याच्यासोबत 2018 च्या दौऱ्यात असंच झालेलं. तेव्हा पाचही वेळा विराटच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला होता.
तसेच ओव्हल कसोटीसह भारताने सलग 15 वा टॉस गमावला. यासह सर्वाधिक 15 वेळा टॉस गमावण्याचा नकोसा विक्रम भारताच्या नावे झाला.
भारतासाठी पाचवा आणि अंतिम सामना हा करो या मरो असा आहे. मालिका बरोबरीत राखण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकायचा आहे.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा