हुश्श! अखेर 2 वर्षांनंतर प्रतिक्षा संपली, इंग्लंडच्या बॉलरसोबत काय झालं?

1 नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

न्यूझीलंड विरुद्धच्या  तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजाची अखेर 2 वर्षांची प्रतिक्षा संपली.

युवा ऑलराउंडर सॅम करनसाठी हा सामना फार खास ठरला. सॅमने जवळपास 2 वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये विकेट घेतली. 

सॅमने रचीन रवींद्र याला आऊट केलं. सॅमने याआधी डिसेंबर 2023मध्ये विंडीज विरुद्ध 3 विकेट्स मिळवल्या होत्या.

सॅम 2 वर्षांत फार वनडे क्रिकेट खेळला नाहीय. सॅमला या दरम्यानच्या काळात फक्त 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी मिळाली.

सॅमने न्यूझीलंड विरुद्ध एकूण 2 विकेट्स मिळवल्या. तसेच 17 धावाही केल्या.

इंग्लंड या सामन्यात अपयशी ठरली. न्यूझीलंडने इंग्लंडला 40.2 ओव्हरमध्ये 222 रन्सवर ऑलआऊट केलं.

न्यूझीलंडने 223 धावांचं आव्हान हे 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. न्यूझीलंडने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली.

हाच खरा 'फॅमिली मॅन'; 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या दिवाळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे कमेंट्स