जो रुटची लव्ह स्टोरी, पबमध्ये जमलं हो जमलं!

25 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

इंग्लंडच्या जो रुटने मँचेस्टरमध्ये विक्रमी शतक ठोकलं.  रुटच्या बॅटिंगबाबत क्रिकेट विश्वाला माहितीय. त्याच्या लव्ह स्टोरीबाबत जाणून घ्या.

जो रुट याच्या पत्नीचं नाव कॅरी कॉट्रेल आहे. जो रुट आणि कॅरी दोघांचा विवाह 2018 साली झाला होता.

जो रुट आणि कॅरी कॉट्रेल या दोघांची भेट हेडिंग्लेमधील एका पबमध्ये झाली होती.

कॅरी हेडिंग्लेमधील एका पबमध्ये काम करायची. कॅरी बार मॅनेजर होती. रुट कॅरीला तिथेच भेटला. 

जो रुट आणि कॅरी यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी असे 2 अपत्य आहेत. मुलाचं नावं अल्फ्रेड आणि मुलीचं नाव इसाबेला आहे.

जो रुट इंग्लंडच्या श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. रुटचं नेटवर्थ 100 कोटींपेक्षा जास्त आहेत.

जो रुटला इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून वार्षिक करारानुसार 9 कोटी रुपये मिळतात. तसेच रुटचा इतर कंपन्यांसह करार आहे.  

जो रुट याचं घर शेफील्डमध्ये आहे. रुटकडे अनेक गाड्या आहेत. 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या