जो रुटची चौथ्या स्थानी झेप, सचिनच्या वर्ल्ड रेकॉर्डच्या आणखी जवळ
3 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
जो रुट याने टीम इंडिया विरुद्ध पाचव्या कसोटीत चौथ्या दिवशी शतक ठोकलं.
रुटने 152 चेंडूत 69.08 च्या स्ट्राईक रेटने 105 धावा केल्या. रुटने या खेळीत 12 चौकार लगावले.
रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 39 वं शतक ठरलं. रुटने यासह इतिहास रचला.
रुटने 39 व्या शतकासह श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा याचा 38 कसोटी शतकांचा विक्रम मोडीत काढला.
जो रुट याने यासह सर्वाधिक कसोटी शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी झेप घेतली.
तसेच जो रुट याने या शतकासह सचिनच्या सर्वाधिक कसोटी शतकाच्या विश्व विक्रमाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलंय.
सचिनने कसोटी कारकीर्दीत 200 सामन्यांमध्ये 51 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच रुट सर्वाधिक शतकं करणारा सक्रीय फलंदाज आहे. त्यामुळे रुटकडे सचिनला पछाडण्याची संधी आहे.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या