इंग्लंडची घरात-बाहेर टीम इंडियासमोर 7 वर्षांपासून वाईट अवस्था, नक्की काय?
5 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
ब्रँडन मॅक्युलम हेड कोच होताच इंग्लंड क्रिकेटमध्ये बेझबॉल पर्वाला सुरुवात झाली. इंग्लंडने असंख्य सामने जिंकले. मात्र इंग्लंडला भारताविरुद्ध एकदाही मालिका जिंकता आली नाही.
फक्त बेझबॉल पर्वच नाही, इंग्लंडला या दशकात 2020 पासून आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध एकदाही कोणतीही मालिका जिंकता आली नाही.
इंडिया-इंग्लंड यांच्यातील सुरु असलेल्या दशकात 10 मालिका खेळवण्यात आल्या. या दरम्यान भारताने मालिका जिंकली. मात्र इंग्लंडची झोली रिकामीच राहिली.
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध 2020 पासून खेळलेल्या 10 पैकी 8 मालिका जिंकल्या. तर 2 मालिका बरोबरीत राहिल्या. इंग्लंडला मायदेशातही मालिका जिंकता आली नाही.
इंग्लंडने टीम इंडिया विरुद्ध अखेरची कसोटी मालिका 2018 साली जिंकली होती. तेव्हापासून इंग्लंडला टीम इंडियाचा मालिका पराभव करता आला नाही.
बेझबॉल पर्वात इंग्लंडला टीम इंडिया-ऑस्ट्रेलियासमोर एकही मालिका जिंकता आली नाही. इंग्लंडला दोन्ही संघांविरुद्ध खेळलेल्या 3 पैकी एकही मालिका जिंकता आली नाही.
तर इंग्लंडने बेझबॉल पर्वात इतर संघांविरुद्ध 10 पैकी 8 मालिकांमध्ये विजय मिळवला.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या