इंडिया-इंग्लंड टेस्टमध्ये वेगवान शतक करणारे 5 फलंदाज, 3 भारतीयांचा समावेश

6 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

भारत-इंग्लंड टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम कुणाच्या नावावर?

भारत-इंग्लंड कसोटीत सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम जेमी स्मिथ याच्या नावावर आहे.

जेमी स्मिथ याने बर्मिंगहॅममधील दुसर्‍या कसोटीत 80 चेंडूत शतक केलं.

भारताकडून इंग्लंड विरुद्ध कसोटीत वेगवान शतकाचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर आहे. देव यांनी 1982 साली 86 चेंडूत शतक ठोकलं होतं.

या यादीत मोहम्मद अझरुद्दीन संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी आहेत. अझरुद्दीन यांनी 88 चेंडूत 1990 साली लॉर्ड्समध्ये शतक केलं होतं.

बेन डकेट याने 2024 साली राजकोटमध्ये 88 चेंडूत शतक केलं आणि अझरुद्दीन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने बर्मिंगहॅममध्ये 2022 साली 89 बॉलमध्ये 100 रन्स केल्या होत्या.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या