वेगवान त्रिशतक करणारे टॉप 5 फलंदाज, वीरेंद्र सेहवाग कितव्या स्थानी?

7 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डर याने झिंबाब्वे विरुद्ध दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक त्रिशतक ठोकलं.

वियान मुल्डर याने  334 बॉलमध्ये 49 फोर आणि 4 सिक्ससह नॉट आऊट 367 रन्स केल्या. 

वियान  मुल्डर वेगवान त्रिशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. वियानने 297 चेंडूत ही कामगिरी केली. 

वेगवान त्रिशक करण्याचा विक्रम टीम इंडियाच्या वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने2008 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  278 चेंडूत ही कामगिरी केली होती.

या यादीत तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा हॅरी ब्रूक आहे. ब्रूकने 2024 साली पाकिस्तान विरुद्ध 310 बॉलमध्ये 300 रन्स केल्या होत्या. 

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने झिंबाब्वे विरुद्ध 2003 साली पर्थमध्ये 362 चेंडूत त्रिशतक केलं होतं.

वीरेंद्र सेहवाग याने 2004 साली मुल्तानमध्ये पाकिस्तान विरुद्ध 364 चेंडूत त्रिशतक ठोकलं होतं.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या