GK : IPL मध्ये सर्वात जलद शतक करणारे फलंदाज कोण ?

Created By: Atul Kamble

24 March 2026

ख्रिस गेल- वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावे आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम आहे.त्याने आरसीबीसाठी खेळताना पुणे वॉरियर्स इंडियाच्या विरोधात २०१३ मध्ये ३० चेंडूत शतक ठोकले होते.

वैभव सुर्यवंशी - वैभव सुर्यवंशीने २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना गुजरात टायटन्सच्या विरोधात ३५ बॉलमध्ये शतक केले होते.

युसूफ पठाण - २०१० मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना युसूफ पठाण याने मुंबई इंडियन्सच्या विरोधात खेळताना ३७ बॉलमध्ये शतक केले होते. 

 हेनरिक क्लासेन - साऊथ आफ्रीकेच्या हेनरिक क्लासेन याने कोलकाता नाईटरायडर्सच्या विरुद्ध २०२५ मध्ये ३७ चेंडूत शतक लावले होते.

डेव्हीड मिलर - २०१३ मध्ये रॉयल चॅलेजर्स बंगलुरुच्या विरुद्ध डेव्हीड मिलरने पंजाब किंग्ससाठी खेळताना ३८ चेंडूत शतक केले होते.

ट्रेव्हीस हेड - सनरायजर्स हैदराबादसाठी खेळताना ट्रेव्हीस हेडने २०२४ मध्ये रॉयल चॅलेजर्स बंगलुरुच्या विरुद्ध ३९ चेंडूत शतक ठोकले होते.

प्रियांश आर्य - प्रियांश आर्यने पंजाब किंग्ससाठी खेळताना चेन्नई सुपर किंग्सच्या विरुद्ध २०२५ मध्ये ३९ बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली होती.