IND vs ENG : टीम इंडियात Ipl मधील या संघातून सर्वाधिक खेळाडूंना संधी
24 मे 2025
Created By: संजय पाटील
इंग्लंड दौऱ्यातील 5 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिल पहिल्यांदाच नेतृत्व करणार आहे.
आयपीएल 2025 दरम्यान इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यात आला. आयपीएलमधील अनेक संघातून खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यासाठी संधी देण्यात आली.
अभिमन्यू इश्वरन याचा अपवाद वगळता उर्वरित 17 खेळाडू कोणत्या न कोणत्या संघाचा भाग आहेत. मात्र कोणत्या टीममधील सर्वाधिक खेळाडूंना संधी मिळाली?
टीम इंडियात गुजरात टायटन्समधील सर्वाधिक 5 खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यासाठी संधी मिळाली आहे
गुजरात टायटन्समधील शुबमन गिल, मोहम्मद सिराज, साई सुदर्शन, प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी
दिल्लीकडून (केएल राहुल, करुण नायर आणि कुलदीप यादव) तर लखनौकडून पंत, आकाश दीप आणि शार्दूल ठाकुर यांना संधी देण्यात आली आहे.
तसेच राजस्थानमधील 2, मुंबई, पंजाब, चेन्नई आणि हैदराबादमधील प्रत्येकी 1-1 खेळाडूला टीम इंडियात संधी मिळाली आहे.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा